सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या शमिका चिपकर हिची दिल्ली येथे होणा-या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड

सावंतवाडी

गोवा येथील पणजी काम्पाल येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेमध्ये कुडाळच्या कु. शमिका सचिन चिपकर हिने 2 सिल्व्हर तर 1 ब्राॅन्झ मेडल पटकावले.
दिल्ली येथे होणा-या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी तिची गोवा राज्यातून निवड झाली आहे. ती सध्या गोवा येथे ‘खेलो इंडिया’ मध्ये जलतरण प्रशिक्षण घेत आहे.