मळगाव येथील सोनुर्ली व मळगाव गावच्या देवस्थानं श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न

हजारो भाविकांनी घेतले श्री देव दोन पुर्वस देवाचे दर्शन

सावंतवाडी

सोनुर्ली व मळगाव या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी थाटात संपन्न झाला. हजारों भाविकांनी श्री देव दोन पूर्वस चरणी लिन होऊन श्री देवी माऊली देवी ओट्या व केळी गोड वस्तू नारळ ठेवून आपले नवस फेडले.

यावेळी सकाळीं सामुदायिक अभिषेक सोहळा संपन्न झाला.त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम सपन्न झाला.यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम सपन्न झाले.

सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावचे जागृत देवस्थान आहे. श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला मळगाव पंचायतनची तरंगकाठी व पालखी सोनुर्ली येथे श्री देवी माऊलीच्या भेटीसाठी आली जाते. तर दोन पूर्व देवाच्या जत्रोत्सवा दिवशी श्री देवी माऊली देवांची पालखी भेटीसाठी दोन पूर्वस जत्रोत्सवा दिवशी मळगाव येथे आली होती. श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवादिवशी काही कारणास्तव कोणाची माऊलीची ओटी भरणे राहीलेल्या भक्तगण यांनी या दोन पूर्वस जत्रोत्सवादिवशी श्री देवी माऊलीची ओटी भरून नवसफेड केले.अशा या दोन गावचे दैवत असलेल्या श्री देव दोन पूर्वस देवाचा जत्रोत्सव मोठया प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी श्री देवी माऊलीचे वाजगाजत आगमन, त्यानंतर श्री देवी माऊलीची ओटी भरणे, दोन पूर्वस देवाला केळी नारळ ठेवणे आदी कार्यक्रम संपन्न झाले. रात्री मंदिराभोवती भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर खानोलकर दशावतार मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. असा हा विवध धार्मिक कार्यक्रम व विवध उपक्रम यांनी हा वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न झाला. यावेळी सोनुर्ली व मळगाव या दोन्ही गावचे मानकरी ग्रामस्थ भक्तगण यांनी एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला.यावेळी हजारों भाविकांनी दर्शनासाठी या ठिकाणी दर्शन करतां गर्दी केली होती.