सावंतवाडी नगरपालिका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना जीवे मारण्याचा कट! पत्रकार परिषदेत बबन साळगावकर यांचा खळबळजनक गौप्यस्फोट!


सावंतवाडी ते आंबोली घाटरस्ता भ्रष्टाचार प्रकरणात उठविला आवाज ! सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण याची दखल घेणार का?
सावंतवाडी
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते आंबोली घाटरस्ता भ्रष्टाचार प्रकरणात आवाज उठविल्याच्या रागातून अधिकारी आणि ठेकेदारांच्या आंबोलीत झालेल्या एका हॉट मिक्स प्लांट संदर्भातील पार्टीत आपल्याला जीवे मारण्याचा कट रचला असल्याचा खळबजनक आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावेळी बबन साळगावकर यांनी कट रचणारे अधिकारी आणि अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आपण सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांच्याकडे करणार आहोत असेही स्पष्ट केले. यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमा वारंग, रवी राऊळ, दीपक सावंत, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू आदी उपस्थित होते. दरम्यान, अशा प्रकरांना आपण घाबरणार नाही. या आधीही असे अनेक हल्ले आपण परतवून लावले आहेत व आजही ती ताकद आहे. त्यामुळे अशा प्रकरांना न घाबरता आमचा भ्रष्टाचार विरोधी लढा सुरुच ठेवणार असे ही त्यांनी स्पष्ट केले.