वेंगुर्ला तालुक्यांतील पेंडूर गावच्या नूतन तलाठी कार्यालयाचे माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते झाले उद्धाटन


सावंतवाडी
तळागाळातील लोकांपर्यत पोहचण्यासाठी नुसता विकास होऊन चालत नाही तर राज्य व केंद्र शासनाच्या छोट्या छोट्या योजना लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजेत.ग्रामपंचायतीने सुद्धा राज्य व केंद्रशासनाच्या वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेऊन बक्षिसे मिळवावीत.सरपंच ही गावातील एक मोठी ताकद आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम केलं तर लोक पाठीमागे राहतात. गावातील विकासकामांच्या मागण्या निश्चितच पूर्ण होतील.
या पेंडूर गावाला एक वेगळी धार्मिक पार्श्वभूमी आहे.सरपंच संतोष गावडे याचंही मोठ योगदान असून गावातील तलाठी कार्यालयाची मागणी आता पूर्ण झाली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजन तेली यांनी पेंडूर येथे केले.
पेंडूर ग्रामपंचायत कार्यालय वर्घापनदिनाचे औचित्य साधून पेंडूर ग्रामपंचात कार्यक्षेत्रातील गेली काही वर्षे प्रलंबित असलेला पेंडूर तलाठी कार्यालयाचे उद्धाटन माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. सावंतवाडी तहसीलदार मनोज मुसळे,पेंडूर सरपंच संतोष गावडे,तलाठी किरण गजनीकर,ग्रामवुकास अधिकारी प्रल्हाद इंगळे,उपसरपंच महादेव नाईक,ग्रामपंचायत सदस्य मिलिंद गावडे, दिपक कवठणकर, नीलेश वैद्य,समिक्षा तांडेल,सुलोचना परब,प्रणिता सावंत,सुहासिनी वैद्य,रंजना हर्जी,व ग्रामपंचायत कर्मचारी वैशाली नाईक,घनश्याम नाईक,तसेच सर्व शासकीय कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सरपंच संतोष गावडे म्हणाले की,पेंडूर गावचे विभाजानंतर ग्रामपंचायत इमारतीचा प्रश्न भेडसावत होता.२०२३ मध्ये ग्रामपंचायत इमारत झाली.शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तलाठी कार्यालय महत्वाचे असते. ८ ते ९ किमी मातोंड गावात तलाठी कार्यालय असल्याने शेतकरी व वृद्धांना याचा त्रास होत होता.आज पेंडूर गावात तलाठी कार्यालय होत आहे.याच सर्व श्रेय माजी आमदार राजन तेली यांना जाते.त्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.यावेळी सरपंच श्री.गावडे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद इंगळे यांनी केले.