पत्रकार व माजी नगरसेवकांच्या एकीला माझा सलाम !! विशाल परब भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष,


सावंतवाडीत आयोजित मैत्रीपुर्ण क्रिकेट सामन्याचे उत्साहात उद्घाटन
सावंतवाडी
आजचे राजकारण कोणत्या दिशेने गेले आहे हे सगळ्यांना माहित आहे. परंतु त्याला फाटा देत सावंतवाडीचे पत्रकार आणि माजी नगरसेवक एकत्र नांदताना दिसतात, हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या या एकीला माझा सलाम, असे कौतुक भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे केले. दरम्यान या अनोख्या एकीतून अनेक गोष्टी शिकण्यासारखे आहेत. पत्रकारांनी मला अनेक गोष्टी शिकवले. त्यातील काही गुण मी रोजच्या राजकीय जीवनात आचरणात आणणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सावंतवाडीतील माजी नगरसेवक व पत्रकारांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मैत्रीपूर्व क्रिकेट सामन्याचे उद्घाटन श्री. विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी परब म्हणाले, या ठिकाणी सावंतवाडीत पत्रकार व माजी नगरसेवक यांची अनोखी मैत्री दिसते. त्याचाच परिपाक म्हणून गेली अनेक वर्षे हा क्रिकेट सामना खेळला जात आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. त्यातून अनेक गोष्टी शिकण्यासारखे आहेत. त्यामुळे त्यांच्या या मैत्रीला माझा सलाम आहे. त्यांच्यातील एखादा गुण मी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेन. यावेळी त्यांनी माजी नगरसेवक उमाकांत वारंग व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. श्री. साळगावकर हे माझ्या वडिलांचे मित्र आहेत. तर मी लहान असताना एका अपघातानंतर रूग्णाला सहकार्य होण्यासाठी वारंग यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. त्यावेळी वारंग यांनी मला मदत केली होती. तर साळगावकर यांनी मला वेळोवेळी सहकार्य केले. त्यामुळे या गोष्टी मी कधीही विसरणार नाही. विशेष म्हणजे या व्यक्ती आजही तशाच आहेत. त्यांच्यात बदल झाला नाही. पत्रकार आणि माझे संबंध अत्यंत दृढ आहेत. त्यांनी केलेल्या सूचना मी नेहमी पाहतो. माझ्या राजकीय जीवनात पत्रकारांचा मोठा वाटा आहे.