अयोध्या येते श्री राम मंदिरात श्री प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज संपन्न झाला तर सिंधुदुर्ग जिल्हा बनला रामभक्त मय!!प्रभू श्री रामभक्तानी जिल्हयात विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे केले होते आयोजन

तळवडे येतील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजित

सावंतवाडी

अनेक वर्षाच्या संघर्षमय प्रयत्नानंतर सोमवारी आज 22 जानेवारी रोजी अयोध्या येते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज संपन्न झाला .

या आनंदमय आणि रोमहर्षक क्षणांच्या स्वागतासाठी पूर्ण जग सज्ज झाले आहे . श्री प्रभू रामचंद्र यांच्या भक्तीसाठी जिल्हयातील सर्व ग्रामदेवता मंदिरामध्ये अभिषेक, पूजा दीपोत्सव अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक गावात ग्राम मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तळवडे येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात व या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी सकाळपासूनच विविध कार्यक्रम आयोजित केले होते. सत्यनारायण महापूजा, तसेच सामूहिक महाआरती, महाप्रसाद भजन कीर्तन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी या कार्यक्रमाला रामभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तळवडे येथील रामभक्त व ग्रामस्थ मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.