सर्वांनी उत्स्फूर्त सहभागातून व्यापारी एकता मेळावा यशस्वी करूया !! नितीन वाळके, उमेश नेरूरकर


सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा एकता मेळावा मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे ३१ जानेवारी रोजी
मालवण,ता.२७
सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या आयोजनातून ३६ वा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा एकता मेळावा मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे ३१ जानेवारी रोजी होणार आहे. या निमित्ताने २९ व ३० जानेवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजनस्थळी नियोजनाच्या दृष्टीने मालवण व्यापारी संघाच्या सर्व सभासद सदस्यांना ओळखपत्र देण्यात आली असून त्याचे प्रकाशन आणि वितरण व्यापारी संघाच्या मालवण शहर येथील कार्यालयात करण्यात आले. यावेळी पदाधिकारी सदस्य व्यापारी वर्ग उपस्थित होते.