३६५ खेड्यांचा अधिपती श्री देव उपरलकर देवांच्या चरणी हजारों भाविक झाले नतमस्तक


सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान वार्षिक उत्सव थाटात संपन्न
सावंतवाडी
महाराष्ट्र गोवा राज्यासह असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व ३६५ खेड्यांचा अधिपती श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा उत्सव गुरुवारी उत्साहात साजरा झाला. सावंतवाडीतील राज घराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठया उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, गोवा राज्यातून दरवर्षी उत्सवाला असंख्य भाविक सावंतवाडीत येतात.
उत्सवाला भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली . देवस्थानकडूनही सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी देवावर अभिषेक व पूजा, उत्सवानिमित्त पूजापाठ, त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तीर्थप्रसाद, वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील भाविकांसह जिल्हाबाहेरील भाविकांनी हजेरी लावत केळी व नारळ ठेवून नवसफेड केली, दर्शनाकरता भविकानी मोठी गर्दी केली होती .