शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 फेब्रुवारी रोजी सावंतवाडीत !खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी गांधी चौक येथे उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभा नियोजनाची केली पाहणी


आम्ही केवळ इथे सभा घेणार नाही तर येणाऱ्या निवडणुकीसाठी विजयाचा निर्धार करणार ! खासदार विनायक राऊत
सावंतवाडी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता सावंतवाडी येत आहेत. त्यानिमित्त सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी गांधी चौक येथे उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभा नियोजनाची पाहणी केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते ,बाळा गावडे, रुपेश राऊळ गितेश राऊत ,आबा सावंत ,शैलेश परब,रुची राऊत, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी राऊत त्यांनी दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला. विकासाच्या फाईलवर कसं बसायचं हे मंत्री दीपक केसरकरांकडून शिकावं. त्याचे उदाहरण म्हणजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. विकासाचे केवळ नारळ फोडायचे आणि पुढे काहीच करायचे नाही. आमच्या आड येण्याचा प्रयत्न करू नका ,आम्ही केवळ इथे सभा घेणार नाही तर येणाऱ्या निवडणुकीसाठी विजयाचा निर्धार करणार असा टोला खासदार विनायक राऊत यांनी दीपक केसरकर यांना लगावला. केसरकरांनी स्वतःची खुर्ची कशी टिकवता येईल हे पहावं आणि मगच बोलावे . लोकसभेच्या निवडणुकीनंतर केसरकर यांची घसरण सुरू होईल अशी जोरदार टीका आज येथे खासदार राऊत यांनी केली.