केरळ राज्यातील भाजपा केंद्रीय पदाधिकारी मा.विनिता हरिहरण यांची साहस प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग संस्थेस सदिच्छा भेट

वेंगुर्ला

साहस प्रतिष्ठान संस्थेच्या कार्याविषयी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या उपक्रमाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी भाजपा केंद्रीय पदाधिकारी विनिता हरिहरण यांनी साहस प्रतिष्ठान च्या सौ.रुपाली पाटील यांची भेट घेतली.

यावेळी दिव्यांग बांधवांच्या कला गुणांविषयी व विविध अडचणी,प्रश्नांविषयी चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकार च्या योजना थेट मिळणे, दिव्यांग विध्यार्थ्यांसाठी विशेष क्रमिक पुस्तकं छपायी होणं, राज्याबाहेर जाताना दिव्यांग क्रिकेटपटुंना रिझर्वेशन्स कोटा उपलब्ध असंणं, सर्व रेल्वे गाड्यांना दिव्यांग डबा असणं, दिव्यांग बांधवांकरिता भारत सरकार आयोजित असणाऱ्या दिव्य कला मेला सहभागी झालेल्या बंधूना येणे जाने व राहणे करिताचा त्यांच्या हक्काचा निधी देतो सांगून आजून पर्यंत दिला गेला नाही.याकरिता आपण दिल्ली येथे संबंधित कार्यालयास विचारणा करणे विषयी, तसेच प्रत्येक तालुक्याला दिव्यांग भवन उभारून तेथे दिव्यांग विकास केंद्र नगरपालिकेच्या मदतीने दिव्यांग बांधवांकरीता चालवणे आवश्यक आहे.अश्या विविध बाबीवर सकारात्मक चर्चा झाली.
या कार्यक्रमाला साहस च्या संस्थापक, अध्यक्षा रूपाली पाटील. विश्वस्त दिपक पाटील , वेंगुर्ला दिव्यांग विकास केंद्र चे सचिव प्रणिता पेंडसे, संघटक छाया कोचरेकर, प्राजक्ता माळकर , सानिया नेकनाळ , दिशा कुंभार , प्रियांका मोबारकर , जोस्पिन डिसोजा, श्रुती पाटील, प्रथमेश पेंडसे असे दिव्यांग बंधू-भगिनी उपस्थित होते.
यावेळी लोकसभा मतदारसंघ प्रभारी आम्रपाली साळवे , भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , महीला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई व अँड. सुषमा खानोलकर , म. जि. सरचिटणीस शर्वरी गांवकर , म.जि.उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर , महीला ता. अध्यक्षा सुजाता पडवळ , माजी सभापती सारीका काळसेकर व स्मिता दामले उपस्थित होत्या .