18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान सावंतवाडी ठिकाणीं होणार छत्रपती शिवरायांच्या दुर्मिळ चित्रांच्या प्रतिकृतीचे आणि शिवकालीन शस्त्रांचे प्रथमच प्रदर्शन


अर्चना घारे परब यांचे आयोजन,प्रमुख अतिथी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील प्रसिद्ध कलाकार बहिर्जी नाईक फेम अजय तापकिरे
सावंतवाडी
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या संकल्पनेतून अर्चना फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगभरातील अस्सल दुर्मिळ चित्रांच्या प्रतिकृती आणि ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे सिंधुदुर्गवासीयांना पाहण्यासाठी दिनांक १८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमासाठी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील प्रसिद्ध कलाकार बहिर्जी नाईक फेम अजय तापकिरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तेव्हा जास्तीत जास्त इतिहास प्रेमी, अभ्यासकांनी, विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन ‘आपला जाणता राजा’ ३५० वर्षांपूर्वी नक्की कसा दिसत होता. अस्सल फोटो प्रतिकृती, त्याबद्दल असणारी माहिती. सोबतच शिवकालीन शस्त्र पहावयास मिळणार आहेत. काझी शहाबुद्दीन हॉल,सावंतवाडी येथे दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ ते २० फेब्रुवारी २०२४ दरम्यान सकाळी १०.०० ते सायंकाळी ८.०० वाजेपर्यंत अनुभूती नक्कीच घ्यावी असे आवाहन सौ. अर्चना घारे परब यांनी केले आहे.