युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जाणून घेणे गरजेचे! डॉ. प्रवीणकुमार ठाकरे

राष्ट्रीय छावा संघटनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तिसरा वर्धापन दिन थाटात साजरा

सावंतवाडी

आजच्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची महती जाणून घेणे गरजेचे आहे. आज त्यांचे विचार आत्मसात केले तर देशाच्या सामाजिक सर्वागीण विकासासाठी मोलाचं काम ठरू शकते.असे मत शिवप्रेमी व सिधूमिञ सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे यांनी राष्ट्रीय छावा संघटना तिसरा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम वेळी मत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय छावा संघटनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तिसरा वर्धापन दिन थाटात साजरा करण्यात आला.राष्ट्रीय छावा संघटनेचा तिसरा वर्धापन दिन सावंतवाडी येथे साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात मोलाचे काम करणाऱ्या कार्यकर्ते यांना गौरविण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय छावा संघटनेचे कार्य वाढवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचे असते गौरव करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर सिंधू मित्रसेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कुमार ठाकरे , सामाजिक कार्यकर्ते सुधीर धुमे, राष्ट्रीय छावा संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर ,जिल्हा प्रवक्ते शिवा गावडे ,जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र कुडाळकर, जिल्हा सचिव कल्याण कदम, जिल्हा खजिनदार मंगेश माणगावकर जिल्हा महिला अध्यक्ष पूजा गावडे, राजे प्रतिष्ठानचे सचिव ज्ञानेश्वर पारधी ,महेन्द्र चव्हाण, सचिता गावडे,तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी या कार्यक्रम प्रसंगी आदर्श शिक्षक केशव जाधव ,अमर पाटील, महेंद्र चव्हाण, सत्यम सावंत ,अमित तळवणेंकर ,मनोहर पाटील ,रवींद्र मोघे ,पूजा गावडे . रेवती मुननकर, निकिता परब, संचिता गावडे, संगीत पारधी, समीक्षा मोघे , रेवती मुंनकर,सपना नाईक ,श्वेता मुनंकर, शेजल पेडणेकर, जिल्हा प्रवक्ते शिवा गावडे, पदाधिकारी कल्याण कदम, मंगेश माणगांवकर, यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवर यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी राष्ट्रीय छावा संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला.

यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रंचालन म संघटनेचे कार्यकर्ते तथा प्रा.केशव जाधव, प्रास्ताविक जिल्हा सचिव कल्याण कदम व आभार संघटनेचे जिल्हा प्रवक्ते शिवा गावडे यांनी मानले.