कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ६७ हायस्कूलना प्रोजेक्टर मंजुर


सावंतवाडी
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभेतील हायस्कूल व महाविद्यालय यांना मंजूर झालेल्या प्रोजेक्टरचे वाटप बुधवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दु. 3.30 वाजता भाजपा सावंतवाडी विधानसभा कार्यालय — गवळी तिठा , सावंतवाडी येथे आम. राजन तेली यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या प्रसंगी श्री वामन तर्फे (अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ) ,श्री.गुरुदास कुसगांवकर सचिव; ,श्री.रामचंद्र घावरे उपाध्यक्ष ,माजी मुख्या. संघ जिल्हाध्यक्ष एम. जी. मातोंडकर सर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी सावंतवाडी तालुक्यातील ३५ हायस्कूल , वेंगुर्ले तालुक्यातील १६ हायस्कूल व दोडामार्ग तालुक्यातील १६ हायस्कूल अशा प्रकारे सावंतवाडी विधानसभेतील ६७ हायस्कूल व महाविद्यालयांना प्रोजेक्टर मंजूर केल्यामुळे विद्यार्थी , शिक्षक व संस्थाचालक यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी या कार्यक्रमास सावंतवाडी विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधी , पदाधिकाऱी , सुपर वाॅरीयर्स , बुथ प्रमुख व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे , असे आवाहन करण्यात येत आहे .