सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन


शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर व उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांची उपस्थिती
भंडारी समाज माझ्या राजकीय वाटचालीत ठामपणे पाठीशी उभा राहिला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
सावंतवाडी
भंडारी समाज माझ्या राजकीय वाटचालीत ठामपणे पाठीशी उभा राहिला आहे. प्रत्येक निवडणुकीच्या विजयात भंडारी समाजाचा वाटा मोठा आहे. त्यामुळे या समाजाच्या ऋणातून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केले.

येथील जिमखाना मैदानावर आजपासून पासून पुढील दोन दिवस सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या बाईक रॅलीचा शुभारंभ मंत्री केसरकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला या प्रसंगी शुभेच्छा देताना ते बोलत होते. तर या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, अशोक दळवी, जिल्हा समन्वयक रुपेश पावसकर, भंडारी महासंघ जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर,सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, माजी जिल्हाध्यक्ष अतुल बंगे, नारायण राणे, डॉ दिनेश नागवेकर, गुरूनाथ पेडणेकर, माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर,वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, योगेश नाईक आदी उपस्थित होते.
भंडारी समाजाच्या युवकांसाठी सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे भरवण्यात आलेली क्रिकेट स्पर्धा हा उपक्रम कौतुकास्पद!किरण उर्फ भैय्या सामंत
यावेळी शुभेच्छा देतांना श्री सामंत म्हणाले,भंडारी समाजाच्या युवकांसाठी सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे भरवण्यात आलेली क्रिकेट स्पर्धा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा स्पर्धांच्या माध्यमातून सांघिकता वाढीस लागते.भंडारी समाजाचा विचार करता आज या समाजाचा एकोपा कायम आहे निष्ठावंत व प्रामाणिक म्हणून समाजातील लोकांकडे पाहिले जाते त्यामुळे समाजाने असे उपक्रम भविष्यातही राबवावे आपण नेहमी पाठिशी उभे राहू.
यावेळी माजी नगराध्यक्ष श्री साळगावकर तसेच अन्य मान्यवराने हे या उपक्रमास भरभरून शुभेच्छा दिल्या. स्पर्धेनिमित्त काढण्यात आलेल्या बाईक रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले हिराले संपूर्ण शहरात काढण्यात आले तब्बल एक हजारो अधिक समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाले होते उद्योजक भैया सामान मंत्री दीपक केसरकर व विविध राजकीय पदाधिकारी संघटनेचे पदाधिकारी ही रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी माजी नगरसेवक सुधीर अडिवरेकर, बाबू कुडतरकर, शेखर गावकर, संदीप नेमळेकर, ज्ञानदीप राऊळ, नंदकिशोर कोंडये,नामदेव साठेलकर,माजी उपसभापती विनायक दळवी, माजी सभापती पंकज पेडणेकर, गुरुदास पेडणेकर, देव्या सूर्याजी, सातोसे उपसरपंच रुपेश साळगावकर, संतोष वैज आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.