राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ,सावंतवाडी शहर कार्याध्यक्षपदी राकेश नेवगी यांची नियुक्ती


कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब यांच्या हस्ते करण्यात आली नियुक्ती
सावंतवाडी

पक्ष संघटन व वाढीसाठी तसेच जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी राकेशजी जोमाने काम करतील असा विश्वास सौ.अर्चनाताई घारे परब यांनी दाखवला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राकेशजी नेवगी हे जुन्या नवीन पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कार्यकारिणी लवकरात लवकर तयार करावी. यामध्ये सर्व जाती धर्माच्या पंथांच्या लोकांना सामावून घेत सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी तयार करण्यात येऊन कामाला लागावे अशा सूचना देखील सौ.अर्चनाताई घारे परब यांनी केल्या.
सदर नियुक्ती प्रसंगी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्षा नितेशा नाईक,सावंतवाडी विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस तसेच सूरज खान, जउर खान,जॉनी फर्नाडिस, काशिनाथ दुभाषी,इफ्तिखार राजगुरू
आणि महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी आदी उपस्थित होते.