सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहिर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण,

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्याचे निश्चिच झाले आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा उमेदवारांची १३ वी यादी घोषित केली असून त्यामध्ये रत्नागिरीमधून नारायण राणेंना उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तत्पुर्वी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत किरण सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार खासदार विनायक राऊत व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात लढत होणार आहे . त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहिर झाल्याने ठिकठिकाणी आनंद उत्सव साजरा केला जात आहे. उद्या सकाळी अकरा वाजता केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरी येथे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.