इंडिया आघाडीचा विजय निश्चित : माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले


इंडिया आघाडीचा विजय निश्चित : माजी राज्यमंत्री
प्रवीण भोसले
विनायक राऊत मोठया मताधिक्याने विजयी होणार
सावंतवाडी : इंडिया आघाडीचा विजय निश्चित होईल. सावंतवाडी मतदारसंघातून मोठें मताधिक्य विनायक राऊत यांना मिळवून देऊ.
मंत्री दीपक केसरकर व माजी आमदार राजन तेली इथे असले तरी आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी व्यक्त केला. सावंतवाडी या ठिकाणी अर्चना घारेंच्या संपर्क कार्यालयात खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले बोलत होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या संपर्क कार्यालयात भेट दिली. यावेळी घारेनी खासदार विनायक राऊत यांच स्वागत केल. याप्रसंगी खासदार विनायक राऊत म्हणाले, सावंतवाडीतील नामवंत व्यक्तींच्या गाठीभेटी आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. लोकांमध्ये मिसळण्यात होणारा आनंद शब्दांत सांगता येणारा नाही.
यावेळी धनुष्यबाण चिन्ह नाही याचं मला दुःख आहे. भाजपने शिवसेना संपवण्याची जे प्रयत्न केले ते गद्दारांनी पूर्ण केले. पण, आमची मशाल नवा प्रकाश टाकेल असा विश्वास व्यक्त करत मनसे पक्ष संपलेला आहे. त्यांच्या पाठिंब्यान आम्हाला फरक नाही पडत असं मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले.