श्री देवी सातेरी मंदिर मातोंड येथे १४ व १५ मे रोजी वर्धापन दिन सोहळा


वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यांतील मातोंड – पेंडूर गावची ग्रामदैवत श्री देवी सातेरी परिवार देवतांचा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त १४ व १५ मे रोजी श्रीदेवी सातेरी मंदिरात विविध कार्यक्रम होणार आहे.
मंगळवार १४ मे रोजी सकाळी ९ वाजता श्री देवी कवच आवृत्ती,सकाळी १० ते १ वाजेपर्यत महिलांसाठी कुंकूमार्चन,रात्री ८ वाजता सुधीर कलिंगण प्रस्तुत ट्रिकसिनयुक्त ‘ काली कंकाली ‘ नाट्यप्रयोग बुधवार १५ मे रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यत महिलांसाठी कुंकूमार्चन,सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजा,दुपारी १.३० वाजता महाप्रसाद,रात्री ८ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ,मोचेमाड यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन समस्त गावकर मंडळी व देवस्थान कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.