तळवडे ते नेमळे रस्त्यांचे अपूर्ण काम तात्काळ पुर्ण करा अन्यथा 21 मे ला सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर उपोषण


तळवडे येतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यकर्ते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले पत्र
सावंतवाडी
तळवडे ते नेमळे रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तात्काळ काम पूर्ण करण्यासाठी तळवडे येतील उद्धव बाळा ठाकरे शिवसेना कार्यकर्ते यांनी पत्र दिले. हया रस्त्यांचे काम तात्काळ पुर्ण न केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल असे यावेळी या पत्रात नमूद करण्यात आले. यावेळी रस्त्यांचे काम पुर्ण न केल्यास 21मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय समोर उपोषण करण्याचां इशारा दिला आहे.
यावेळी अनिल जाधव, विलास परब, रविंद्र परब, बाबुराव परब रविंद्र काजरेकर, आपा परब, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यकर्ते निवेदन देतेवेळी उपस्थित होते.