तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९१.१७ टक्के


न्हावेली / वार्ताहर
तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९१.१७ टक्के लागला. या महाविद्यालयातून बारावी परीक्षेत ३४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचा निकाल ९१.१७ टक्के लागला.
कु. सानिका यशवंत गोसावी ७१.१७ टक्के प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक सिद्धेश दिपक जाधव ६१.१७ टक्के तर संतोष आत्माराम परब ५९ टक्के घेऊन तृतीय आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष विष्णू पेडणेकर सी ईओ श्रीकृष्ण पेडणेकर,खजिनदार,डॅा.कांडरकर व सर्व पदाधिकारी प्राचार्य प्रतापराव देसाई ,पर्यवेक्षक दयानंद बांगर,शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर,कर्मचारी आणि पालक सर्वाकडून अभिनंदन