सावंतवाडी तालुक्यात बौद्ध जयंती थाटात साजरी

सावंतवाडी

मळगाव माता रमाई डाँ. बाबासाहेब आंबेडकर नगर येते बौद्ध जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. यावेळी
श्री.चंद्रकांत भोजु जाधव. डाँ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा चिटणीस याच्या हस्त्ये बौद्धाच्या व डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हा पुष्प हार घालण्यात आला..

यावेळी दीप.धुप प्रज्वलन त्या नंतर त्रीसरण पंचशील घेण्यात आले. बौद्ध जयंती साजरी करण्यात चंद्रकांत जाधव यानी सर्वाना शुभेच्छा दीले. मंगल हो बुद्ध आणि त्यांचा धम्म”जे असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सदगती प्राप्त होत नाही.”
” परंतु जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य समजतात, अशा सम्यक दृष्टी संपन्न लोकांनाच सदगतीचा लाभ मिळतो.”
जगात सर्वांनाच मृत्यू येतो.त्याच्या पासून कोणाचीही सुटका नाही. ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होणारच ही गोष्ट सर्व प्राणिमात्रांच्या बाबतीत लक्षात घेऊन जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे,म्हणजे खरी धम्मसाधना होय.”
हीच खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची कला आहे…
असे चंद्रकांत जाधव यानी उपस्थितीत असलेल्या बाधवाना बुद्ध विचार समजाऊन सांगितले..यावेळी मळगाव माजी सरपंच अर्चना जाधव.. वाॅर्ड क्रमांक 5 चे बुथ अध्यक्ष सुखदेव राऊळ..देऊ जाधव.रमेश जाधव. सरस्वती जाधव..अनिल जाधव.उपस्थितीत होते.