श्री जनता विद्यालय तळवडे मधील 1991 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न!33वर्षांनी आले एकत्र

सावंतवाडी

जनता विद्यालय तळवडे येथील 1991 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा श्री जनता विद्यालय तळवडे येथे संपन्न झाला .तब्बल 33 वर्ष लोटल्यानंतर एकत्र आलेल्या सर्व मित्रांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देऊन अद्भुत आनंद लुटला!.
अगदी गोवा ,पुणे ,मुंबई येथून आलेल्या, गोविंद भाईडकर ,श्रीराम दळवी ,राजाराम दळवी, घनश्याम गोडकर, रूपाली परब, उषा दळवी ,प्रेमा परब ,सुनंदा परब, संगीता भाईडकर ,प्रज्ञा पेडणेकर ,वनिता पेडणेकर, विठ्ठल गावडे ,नंदकिशोर परब, वीणा जोशी संध्या काजरेकर,गजानन परब, भगवान तळवणेकर ,अशा जवळजवळ 30-35 मित्रांनी आपले शालेय जीवन पुन्हा अनुभवले.

सकाळी सर्व मित्रगण श्री जनता विद्यालयात जमा झाले .यावेळी सेवानिवृत्त शिक्षक श्री घाडी सर, श्री तिरपुडे सर, श्री मालवणकर सर ,सौ चिपकर बाई, सौ प्रभू बाई या माजी शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .उपस्थित सर्व शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक श्री देसाई सर उपस्थित होते.या वेळी कै .कशाळीकर सर , कै पाटकर सर , कै भिडे सर,कै चिपकर सर ,कै डी पवार सर,या शिक्षकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.तसेच वर्गमित्र कै संतोष (बाबल्या) मालवणकर,कै.दादा पेडणेकर, आणि कै किरण तळवणेकर यांच्याही आठवणींना उजाळा देण्यात आला

उपस्थित असलेल्या मित्रांपैकी महेंद्र गावडे, श्री कृष्णा बाईत, उल्हास पै, छाया मालवणकर स्वरूपा मठकर, प्रसाद गावडे यांनी समायोजित भाषणे केली.स्नेह मेळाव्यानिमित्त अल्पोपहार आणि प्रीती भोजनाचे आयोजन केले होते. यावेळी स्वरूपा मठकर, महेंद्र गावडे, गणपत पांढरे यांनी गाणी म्हणून कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केशव तुळसकर, प्रसाद नागडे ,विवेकानंद तळवणेकर, प्रसाद पेडणेकर ,प्रशांत रेडकर ,हरीश नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश नाईक व गणपत पांढरे यांनी केले. प्रीती भोजन आटोपल्या नंतर भारावलेल्या सर्व मित्रांनी पुन्हा पुढच्या वर्षी भेटण्याचे आश्वासन देऊन एकमेकांचा निरोप घेतला.