रोटरी क्लब सावंतवाडीतर्फे ५ विद्यार्थ्याना शैक्षणिक मदतीसाठी घेण्यात आले दत्तक


सावंतवाडी –
रोटरी क्लब सावंतवाडीतर्फे ४ मुली व १ मुलगा असे ५ विद्यार्थ्याना शैक्षणिक मदतीसाठी दत्तक घेण्यात आले असुन या मुलाना यावर्षी लागणारे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
किमान पुढील 3 वर्ष यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आली आहे.. यासाठी रो.विजय कामत, रो.डॉ. राघवेंद्र तळेगावकर, रो.प्रदीप शेवडे व रो.सुहास सातोस्कर यांनी जबाबदारी स्विकरली आहे. योग्य लाभार्थी निवडण्याचे काम बाड मॅडम यांनी केले.तसेच तळवडे येथील जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थीनींसाठी “वयात येताना“ याविषयावर रो.विनया बाड यानी मार्गदर्शन केले.

यावेळी या हायस्कूलच्या वाचनालयाला डॉ.रधुनाथ माशेलकर आणि “अस्मिता” (मुली वयात येताना) ही दोन पुस्तके रोटरी अध्यक्ष रो.सुहास सातोस्कर यानी भेट दिली.तसेच तळवडे येथील दुसऱ्या इंग्लिश मिडियम स्कूलला भेट देऊन त्याना डाॕ.रधुनाथ माशेलकर यांचे पुस्तक भेट देण्यात आले. आणि वृक्षारोपण आणि वयात येताना या कार्यक्रमा संदर्भात माहिती देण्यात आली.यावेळी क्लबचे सचिव रो.प्रविण परब आणि रो.दिलीप म्हापसेकर यावेळी उपस्थित होते.

