वेंगुर्लेत आडेली – गवळीवाडी येथे म्हैशीच्या अंगावर विद्युतभार वाहीनी पडुन म्हैस मृत्युमुखी

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी म्हैस मालकाला केली तातडीने मदत .

वेंगुर्ला

वेंगुर्ले तालुक्यातील आडेली – गवळीवाडी येथे रहाणारे गवळी श्री.प्रशांत मनोहर गवळी यांच्या एका म्हैशीवर विद्युतभार वाहिनी पडुन मृत्युमुखी पडली व एक म्हैस गंभीर जखमी झाली. त्यामुळेच गोरगरीब शेतकऱ्यावर आभाळ कोसळले . गेली ४५ वर्षे परंपरागत दुधविक्री व्यवसाय करणारे गवळी कुटुंब फार खचुन गेले . सदर घटना भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या निर्दशनास आणल्यावर ताबडतोब आडेली – गवळिवाडी येथे जात प्रशांत मनोहर गवळी यांची भेट घेऊन तात्काळ रोख स्वरूपात मदत केली . तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे पाठपुरावा करुन शासनस्तरावर जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल असे अभिवचन दिले .
यावेळी आडेली गावच्या सरपंचा सौ.यशस्वी कोंडसकर यांच्या हस्ते रोख रक्कम प्रशांत गवळी यांना सुपूर्द करण्यात आली .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर ,कुडाळ युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे , तेर्सेबांबार्डे ग्रामपंचायत सरपंच रामचंद्र परब , आडेली शक्तिकेंद्र प्रमुख तात्या कोंडसकर , तेर्सेबांबार्डे शक्तिकेंद्र प्रमुख अजय डिचोलकर , मा.पोलीस पाटील पांडुरंग आडेलकर , राजु सामंत , ग्रा.पं.सदस्य महेंद्र मेस्त्री , प्रकाश साटेलकर , राजेश गवळी , दत्ताराम गवळी तसेच आडेली – गवळीवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते .