लोकराजा राजर्षी शाहू राज्यस्तरीय गौरव पुरस्कार” सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येतील संस्कार नॅशनल स्कूल संस्था माजी अध्यक्ष श्री शेखर जैन यांना जाहीर

सावंतवाडी

अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून देण्यात येणारा “लोकराजा राजर्षी शाहू राज्यस्तरीय गौरव पुरस्कार” यावर्षीचा सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येतील संस्कार नॅशनल स्कूल सस्था माजी अध्यक्ष श्री शेखर जैन यांना जाहीर करण्यात आला आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना प्रतिवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी पुरस्कारासाठी निवडीचे पत्र त्यांना दिले आहे.