प्रगत विद्यामंदिर रामगड येथे कृषी दिन साजरा


मालवण/प्रतिनिधी:
रामगड येथील प्रगत विद्यामंदिर रामगड येथे 1 जुलै कृषी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. 1 जुलै कृषी क्रांतीचे जनक व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतनिमित्त साजरा केल जातो. छ्त्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस-ओरोस च्या विद्यार्थ्यांनी रामगड गावातील प्रगत विद्यामंदिर रामगड येथे कृषि दिन साजरा केला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी प्रगत विद्यामंदिर रामगड चे मुख्याध्यापक श्री. अंकुश वळंजु व इतर शिक्षक व इतर उपस्थितीत होते. कृषी दिनानिमित्त कृषीदिंडीचे आयोजन करण्यात आले होते, विद्यार्थ्यांना वृक्षारोपणचे महत्व पटवून देवून आंबा, साग, सुरंगी, कैलासपती अशी विविध झाडे लावण्यात आली. कृषि दिनानिमित्त सेंद्रीय शेती व नैसर्गिक शेतीचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच कृषीदुत राम बिबवणेकर व श्रीपाद वास्कर यांनी विविध कृषी क्षेत्रातील संधी व नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती च महत्त्व सांगितली. यानंतर मुख्याध्यापक वळंजू सरांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केल. तसेच क्रीडा शिक्षक सावंत सरांनी झाडाबदल मार्गदर्शन केल. यानंतर भव्य अशी वृक्षदिंडी रामगड बाजारपेठ मधून काढण्यात आली.
तसेच शाळेच्या क्रीडांगणावर वृक्षारोपण करण्यात आलं.
यावेळी शाळेतील शिक्षक मा. कांबळे सर, देशमुख सर व इतर शिक्षक वर्ग तसेच सर्व विद्यार्थी व कृषीदुत हर्षवर्धन भोसले, प्रतीक चौगले, ओंकार पाटील, शुभम जाधव,राम बिबवणेकर,श्रीपाद वास्कर आदी उपस्थित होते.