सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ मध्ये पुराचे पाणी घुसले.दुकानदार याचे झाले नुकसान तर तळवडे होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक ७ तास ठप्प

सावंतवाडी प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्यात आज मुसळधार पाऊस पडला या सततधार  पडलेल्या पाऊसामुळे सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण  भागातील नदीनाले याना पूर आल्याने वाहतूक ठप्प  झाली. सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्गावरील होडावडे पुलावर पाणी आल्याने ७ तास वाहतूक ठप्प होती . वाहनचालक व प्रवाशी याचे मोठे हाल झाले .


 तळवडे बाजारपेठ मध्ये तर पुराचे पाणी घुसले.  वाढती दुकानाची संख्या यामुळे पाण्याचा निचरा होण्याचे प्रमाण घटल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले  आहे . यामुळे अनेक दुकानदार याच्या सामानाची वनासधूस झाली तसेच तळवडे बाजारपेठ मध्ये गटार  बांधकाम याचे नियोजन नसल्याने पाणी दुकानात शिरते जी गटारे आहेत त्याची संबंधित बांधकाम विभाग कडून साफसफाई पण झाली नाही . त्यामुळे लगेच पाणी दुकानात शिरत  आहे .सतत धार पडलेल्या पाऊसामुळे तळवडे नेमळे , तळवडे मातोंड ,वाहतूक काही तास बंद झाली होती. पुलाची उंची कमी असल्याने पुलावर सतत पाणी येते. होडावडे नदीला पूर आल्याने मोठी समस्या निर्माण झाली.सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्गावरील होंडावडे  तळवडे पुलावर पाणी आल्याने वाहतूक लगेच ठप्प होते त्यामुळे यापूलाची उंची वाढवावी अशी मागणी वाहनचालक व प्रवाशी वर्ग यांच्याकडून होत आहे