सावंतवाडी शहरातील शाळा क्र ४ मधल्या चिमुकल्यानी आषाढी एकादशी निमित्त काढली दिंडी


विठ्ठल-रुक्मिणी आणि संतांची साकारली भूमिका
सावंतवाडी,
आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर चार च्या विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक यांनी दिंडीचे आयोजन केले होते. यामध्ये विविध संत तसे च विठ्ठल ,रुक्मिणी इत्यादी पात्रांची वेशभूषा हे या दिंडीचे आकर्षण ठरले. विठुरायाच्या गजरात शाळा सावंतवाडीनं4 ते विठ्ठल मंदिरापर्यंत या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते . नेहमीच विविध उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या या शाळेचा हा नाविन्यपूर्ण स्तुत्य असा हा उपक्रम सगळ्यांच्याच आकर्षणाचा विषय ठरला. भक्तीरसात न्हावून निघालेली ही दिंडी विठ्ठल दर्शनानंतर पुन्हा माघारी फिरली. यामध्ये शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष श्री संतोष तळवणेकर, सदस्य,शिक्षक पालक संघ ,माता पालक संघ, समस्त विद्यार्थी वर्ग तसेच मुख्याध्यापक श्री पावरा सर, तसेच श्री धारगळकर मॅडम ,श्री पालव सर ,श्री घाडी मॅडम, श्री शिंदे मॅडम, श्रीम नाईक मॅडम, श्रीम बांदेकर मॅडम,श्रीम पवार मॅडम श्रीम सावंत मॅडम इत्यादी शिक्षक वर्ग सुद्धा सामील झाला होता.
