शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या मुळेच मतदारसंघ विकासापासून वंचित महाविकास आघाडीच्या नेत्यांची सावंतवाडी येथील बस स्थानक समस्या संदर्भात घंटानाद आंदोलन वेळी केली जोरदार टीका


चष्मा , कारखाना, सेटटाॅपबाॅक्स कारखाना,,आता जर्मनी सर्व फसवी आश्वासनं माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
सावंतवाडी,
सावंतवाडी मतदारसंघाचा आश्वासने देऊन गेल्या पंधरा वर्षांत शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी विकास केला एक पणं त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू नाही.
त्यामुळे मला आमदार बदलायचा आहे, असे घोषवाक्य घेऊन मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण मतदारसंघ महाविकास आघाडीच्या नेत्यांना सोबत घेऊन व जनतेला सोबत घेऊन पराभव करणार आहे. त्याशिवाय सावंतवाडी मतदारसंघाचा विकास होणार नाही, असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज सावंतवाडी बस स्थानक समस्या संदर्भात करण्यात आलेल्या घंटानाद आंदोलन वेळी मत व्यक्त .

२०१७ मध्ये एसटी स्टँडचे भूमिपूजन होवून पणं त्यांचे काम पूर्ण होऊ झाले नाही,एस टी ची जागा गुरांच्या गोठ्या पेक्षा भयानक झाली असुन याला जबाबदार केसरकर आहेत. असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राव यांनी यावेळी जोरदार टीका केली.त्यामुळे त्यांना जाग आणण्यासाठी हे घंटानात आंदोलन करत असल्याचे देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा समन्वयक चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांनी मत व्यक्त केले.श्री साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून एसटी स्टँड परिसरातील दुरवस्थेबाबत आज मंत्री केसरकर यांच्या विरोधात घंटानात आंदोलन करण्यात आले.
.काल सायंकाळी उशिरा पोलिसांमार्फत नोटीस पाठवून माझे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत होते, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावंतवाडी तालुका प्रमुख पुंडलिक दळवी यांनी पण यावेळी यांनी केसरकर यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नेते मंडळी यावेळी उपस्थित होते.

