वेंगुर्लेत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्य वाटप शिबिरात कामगारांचा उस्फूर्त प्रतिसाद


भाजपा कामगार आघाडी च्या पदाधिकाऱ्यांचा यशस्वी पाठपुरावा .
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२००० बांधकाम कामगारांना त्यांच्या तालुक्यात गृहउपयोगी भांडी संचाचा लाभ मिळणार —–
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई .
वेंगुर्ला
वेंगुर्लेत साईदरबार हाॅल मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व महाराष्ट्र शासनाकडून वेंगुर्ले तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या संसारासाठी हातभार म्हणून गृहपयोगी साहित्य वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमाचा शुभारंभ.नगराध्यक्ष राजन गिरप , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , कामगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व मनवेल फर्नांडिस , कामगार आघाडी सावंतवाडी विधानसभा प्रमुख सत्यम सावंत , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , आसोली उपसरपंच संकेत धुरी , किरण कुबल , विनोद सावंत , नाना राऊळ इत्यादी उपस्थित होते .
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिवीत नोंदणी असलेल्या ५१७० एवढ्या बांधकाम कामगारांना लोकसभा निवडणुकीपुर्वी गृहपयोगी ३० भांड्यांचा संच भाजपा कामगार आघाडीच्या मागणीनुसार व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार कामगारांच्या सोयीच्या दृष्टीकोनातून तालुका स्तरावर वाटप करण्यात आले होते .

मध्यंतरीच्या काळात आदर्श आचारसंहितेच्या कारणास्तव भांडी वाटप बंद करण्यात आले होते . याबाबत भाजपा कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत व जिल्हाध्यक्ष अशोक राणे व पदाधिकाऱ्यांनी सहायक कामगार आयुक्त तथा सरकारी कामगार अधिकारी संदेश आयरे यांच्याशी संपर्क साधून कामगारांना केले जाणारे भांडी संच वाटप जिल्हास्तरावर न करता कामगारांच्या सोयीच्या दृष्टीने तालुकास्तरावर करण्याची मागणी केली होती .
लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामगारांच्या हितासाठी व सोयीसाठी प्रत्येक तालुक्यात कामगार सेवा सुविधा केंद्र शासन सुरु करणार असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी सांगीतले . तसेच बांधकाम कामगारांचे ऑफलाईन फाॅर्म तात्काळ मंजूर होण्यासाठी खासदार नारायणराव राणे प्रयत्न करीत आहेत , त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील ६४३२ बांधकाम कामगारांना याचा फायदा मिळणार असल्याचे सांगीतले .या शिबीरात जवळजवळ ४०० बांधकाम कामगार उस्फूर्त पणे सहभागी झाले .