सावंतवाडी तालुक्यात रोणपाल- सोनुर्ली जंगलात एक विदेशी (फॉरेनर) महिला साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आली आढळून

महिलेवर सावंतवाडी कुटीर रुग्णालयात उपचार आहेत सुरू

सावंतवाडी

रोणपाल- सोनुर्ली येथील जंगलात एक विदेशी (फॉरेनर) महिला साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. ही घटना आज सकाळी एका गुराख्याच्या जागरूकतेमुळे उघडकीस आली आहे.या महिलेवर सावंतवाडी कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती सुधारत आहे. परंतु अद्याप पर्यंत ती काही बोलू शकत नसल्यामुळे पुढील तपास करण्यासाठी अडचणी येत आहेत. या महिलेचे नाव ललिता कायी कुमार एस असून ती तामिळनाडू मधील रहिवासी आहे.ती मूळ अमेरिकन नागरिक असल्याचे देखील समजते. तिच्या उजव्या पायाला साखळदंडा घालून ते एका झाडाला बाधून ठेवले होते.. मुसळधार पाऊस आणि सलग तीन दिवस उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती. आज जंगलात सोनुर्लीतील काहीजण गुरे घेऊन गेले असता या महिलेचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर हा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. आज सकाळी पोलिसांनी तिला साखळदंडातून सोडवण्यात आले असून तिला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.