काँग्रेस कडून विधानसभेसाठी विलास गावडे यांच्या नावाला पसंती.!! तालुका उपाध्यक्षपदी शिवा गावडे तर तांबोळी मतदारसंघाच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब देसाई यांची निवड

सावंतवाडी

सावंतवाडी या ठिकाणीं येथील तालुका काँग्रेसच्या माध्यमातून विधानसभेसाठी विलास गावडे यांच्या नावाला पसंती देण्यात आली. त्यांना महाविकास आघाडीतून संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान यावेळी सावंतवाडी काँग्रेस कमिटीचे तालुका उपाध्यक्षपदी शिवा गावडे तर तांबोळी मतदारसंघाच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब देसाई यांची निवड करण्यात आली. सावंतवाडी काँग्रेसची बैठक नुकतीच या ठिकाणी पार पडली.

यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इरशाद शेख, कार्याध्यक्ष विलास गावडे, तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, अँड संभाजी सावंत,आनंद परुळेकर, रुपेश आईर, राजू मसुरकर, बाळासाहेब नंदीहाळी,संतोष सावंत अरुण नाईक, संजय गावकर, विभावरी सुकी, आमिधी
मेस्त्री, अभय मालवणकर, माया चिटणीस, हरिश्वंद्र मांजरेकर, स्मिता वागळे, अन्वर खान, सुमेध सावंत, प्रतीक्षा भिसे, अरुण भिसे, बासिफ पडवेकर, रमेश चव्हाण, कौस्तुभ पेडणेकर, गणपत मांजरेकर, राजेंद्र सावंत, संजय लाड, पवन बनवे, राहुल कदम,रणजीत माने, रणजीत सांघले, रविराज पेडणेकर, समीर भाट,लक्ष्मण भुते, संदीप सुकी, मधुकर जाधव, समीर वंजारी, संजयगावकर, चौरंगनाथ सावंत पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.