कावळेसाद पॉइट जमिनीवर नेमका डोळा कोणाचा?त्यांची नावे मंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी जाहीर करावी!

सावंतवाडी

आंबोली पर्यटन भागात कावळेसाद पॉइट येथील जमिनीवर कोणाचा डोळा आहे? त्यांची नावे शालेय शिक्षण मंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी जाहीर करावी. त्यांची नावे जाहीर करण्यासाठी का घाबरतात? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज सावंतवाडी येते आयोजित पत्रकार परिषदेत केला.

गेळे ग्रामस्थांनी त्यांच्या विरोधात केलेले आंदोलन केसरकर यांनी केलेल्या फसव्या घोषणांच्या विरोधात आहे. आम्ही त्या ग्रामस्थांचे कौतुक करतो. ठाकरे शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. मात्र त्यांचा आदर्श घेऊन मतदारसंघातील अन्य ग्रामस्थांनी केसरकरांच्या फसव्या आश्वासनांची भांडाफोड करावी, असे आवाहन यावेळी रूपेश राऊळ यांनी केल.

मंत्री दिपक केसरकर विकास काम झाले नाही की ते माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे किंवा विनायक राऊत यांची नावे घेतात.जनतेने अशा व्यक्तीपासून सावध राहिले पाहिजे. आता गेळे येथील ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात आले. तसेच आंदोलन इतर गावातील ग्रामस्थ करतील.१५ वर्षात फक्त फसवणूक केली आहे.एकही विकासाचे पूर्ण केले नाही. असा आरोप ही राऊळ यांनी केला.यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार,शिवप्रसाद घोगळे उपस्थित होते.