आगामी विधानसभेत महाराष्ट्रासह कोकण जिंकायच आहे. त्यामुळे आपापसातील मतभेद, गट-तट बाजूला ठेवा! पक्ष देईल त्या उमेदवाराल निवडून आणण्यासाठी जोरदार तयारीला लागा!खासदार नारायण राणे


सावंतवाडी या ठिकाणी भाजपाच्या विस्तारीत अधिवेधनात खासदार नारायण राणे यांनी केलं भाजप नेते व कार्यकर्ते यांना आवाहन
सावंतवाडी
आगामी विधानसभेत महाराष्ट्रासह कोकण जिंकायच आहे. त्यामुळे आपापसातील मतभेद, गट-तट बाजूला ठेवून पक्ष देईल त्या उमेदवाराल निवडून आणण्यासाठी जोरदार तयारीला लागा, तुम्ही पक्षाला काही तरी दिलात तर नक्कीच पक्ष तुम्हाला परतफेड करेल. त्यामुळे आता थांबू नका, इच्छुकांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे आवाहन आज येथे आयोजित भाजपाच्या विस्तारीत अधिवेधनात खासदार नारायण राणे यांनी केले.
आपण संयमी राहिलो तर त्यांचा फायदा अनेक जण उठविणार आहेत. त्यामुळे नेत्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांचा निषेध करा आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. जिल्ह्यात ठाकरे शिवसेना राहता नये यासाठी काम करा, असे यावेळी अशी ही हाक त्यांनी यावेळी दिली.

यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खासदार नारायण राणे आणि त्यांना निवडून आणणाऱ्या राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा नागरी सत्कार करण्यात आला . यावेळी श्री. राणे पुढे म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मला मताधिक्याने मी निवडून आलो, हा विजय म्हणजे तुम्ही कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पोचपावती आहे,
तर माझ्या विजयात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी निश्चितच पुर्ण करणार आहे, असे सांगून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतूक केले तसेच ते ३ वेळा पंतप्रधान झाले याचामला सार्थ अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, श्वेता कोरगावकर, युवराज लखमराजे भोसले, महेश सारंग, दादा साईल, रणजित देसाई, विशाल परब व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

