सिंधुदुर्ग आरटीओ विभागाच्या उद्या सिंधुदुर्ग परिवहन कार्यालय येते आंदोलन

माजी आमदार जिजी उपरकर समर्थक तथा वाहन चालक असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने होणारं आंदोलन

सवंतवाडी


सिंधुदुर्ग आरटीओ विभागात मोठया प्रमाणात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे उद्या सिंधुदुर्ग परिवहन कार्यालय येथे सकाळी 10.30 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या समर्थकांनी केले आहे.

कार्यालयात चाललेल्या विविध भ्रष्टाचाराबाबत त्याचप्रमाणे लक्झरी बस मधून होत असलेल्या मालवाहतूक तसेच विनापरवाना विना जीएसटी व मुंबई गोवा महामार्गावर साईन बोर्ड तसेच ॲम्बुलन्स नंबर हेल्पलाइन नंबरचे फलक,तसेच येणाऱ्या चतुर्थी सणात चाकरमानांना त्रास होऊ नये म्हणून लक्झरीचे कमी दरात भाडे आकारणी तसेच लक्झरी मधून होत असलेली दारू ,अमली पदार्थ वाहतूक ,सोन्याची होत असलेली तस्करी व गाड्यांमधून होत असलेली गोमास तस्करी अशा आरटीओ कडून चाललेल्या विविध समस्या संदर्भात माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक तथा वाहन चालक असोसिएशन सिंधुदुर्ग अध्यक्ष विजय जांभळे उपाध्यक्ष स्वप्निल जाधव ,त्याचप्रमाणे आबा चिपकर व मंदार नाईक यांनी सोमावारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरटीओ कार्यालय सिंधुदुर्ग यांना त्यांचा भ्रष्टाचार दाखवून देऊ असा इशारा दिला आहे .

यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर उपस्थित राहणार असून त्यांच्या नेतृत्वा खाली सदर आंदोलन करणार असल्याचा

इशारा
उपरकर समर्थक तथा वाहन चालक असोसिएशन सिंधुदुर्ग चे अध्यक्ष विजय जांभळे व मंदार नाईक यांनी दिला आहे