भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तालुका कार्यालयात ” मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ” फाॅर्म वाटप होणार- प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष – भाजपा सिंधुदुर्ग

सावंतवाडी

भाजपा च्या वतीने वेंगुर्लेत तालुका कार्यालयात बुधवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० – ३० वाजता ” मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ” फाॅर्म वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .
६५ वर्षांवरील किंवा त्यावरील वयोगटातील जेष्ठ नागरिकांना वयोमानापरत्वे येणारे अपंगत्व , अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने – उपकरणे खरेदी करण्यासाठी , तसेच मनस्वास्थ्य केंद्र , योगोपचार केंद्र याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी शासनाने राज्यात ” मुख्यमंत्री वयोश्री योजना ” राबवीण्यास सुरुवात केली आहे .
या योजनेद्वारे नागरीकांना ३००० रु. शासनाकडून दिले जाणार आहेत , तरी वेंगुर्लेतील जेष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा , असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले आहे .