सावंतवाडी नगरपरिषद बनली भ्रष्टाचाराचे कुरण माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

मंगळवारी सावंतवाडी मुख्याधिकारी यांना घेराव घालत विचारणार जाब

सावंतवाडी । प्रतिनिधी

सावंतवाडी नगरपरिषद एक स्वच्छ, सुंदर कारभाराची नगरपरिषद म्हणून ओळखली जाते. पणं आज या नगरपरिषदेचा कारभार नवीन अधिकाऱ्यांच्या हातात गेला आहे. नगरपरिषद हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. आणि ते कुरण खाल्लंच पाहिजे अशा अविर्भावांमध्ये नगरपरिषदेचा कारभार सुरू आहे असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला.

सावंतवाडी नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराबाबत जाब विचारण्यासाठी मंगळवारी सावंतवाडी मुख्याधिकारी यांना घेराव घालत जाब विचारणार असे माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी सांगितले.

दोन महिन्यापूर्वी घाई गडबडीत केलेले शहरातील रस्ते संपूर्णत: खराब झाले. या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले सार्वजनिक शौचालयाची अवस्था भयानक आहे, ठिकठिकाणी रस्त्यावरती कचरा साठलेला दिसतो , डासाचा फैलाव झालेला आहे, त्याचबरोबर रस्त्यावरील स्ट्रीट लाईट देखील बंद पडलेले आहेत, गार्डन ,स्मशानभूमी अस्वच्छता या सर्व बाबींचे तीन तेरा वाजले आहेत असा आरोप साळगावकर यांनी केला.