सावंतवाडी विधानसभा उबाठा शिवसेना संपर्क यात्रा आज तुळस, उभादांडा,रेडी, जिल्हा परिषदमध्ये आणि वेंगुर्ला शहरात

वेंगुर्ला :

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून आज दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी वेंगुर्ला तालुक्यातील तुळस, उभादांडा, रेडी, जिल्हा परिषदमध्ये आणि वेंगुर्ला शहरामध्ये साजरा होत आहे.

दि. ३०ऑगस्ट २०२४ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे….

मातोंड स. ९.३० वा.स्थळ रवी मातोंडकर यांच्या घरी (सातेरी मंदिर नजिक)
आसोली स. ११वा.स्थळ तुकाराम घाडी यांच्या घरी
उभादांडा दु. १२ वा.स्थळ हेळेकर मंदिराजवळ
रामघाट रोड दु. १वा.स्थळ सातेरी मंगल कार्यालय
आरवली दु. ३ वा. स्थळ शिवसेना शाखे जवळ( आरवली)
रेडी संध्या ४ .वा.स्थळ रेडकर हाॅस्पिटलच्या माडिवर
वेंगुर्ला शहर संध्या.५ . वाजता
वेंगुर्ला शहर संध्या. ६ वाजता
वेंगुर्ला शहर संध्या. ७ वाजता

सदर शिवसेना संपर्क यात्रेमध्ये जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा संपर्कप्रमुख कालिदास कांदळगावकर, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा समन्वयक चंद्रकांत गावडे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, महिला आघाडी विधानसभा संघटक सौ. सुकन्या नरसुले, उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, संदेश निकम, निलेश चमनकर, चंद्रकांत कासार, प्रकाश गडेकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, सावंतवाडी तालुका संघटक मायकेल डिसोझा, युवासेना तालुका अधिकारी  पंकज शिरसाठ, शहर प्रमुख अजित राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. तरी वेंगुर्ले तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी केले आहे.