शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत तळवडे गावातील शेतकरी सुरभा परब यास दिला आर्थिक हातभार

सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी शेतकरी सूरभा परब यांची घेतली भेट

तळवडे प्रतिनिधि

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत तळवडे गावातील शेतकरी सुरभा परब यास आर्थिक हातभार लावण्यात आला. तळवडे गावातील गरीब शेतकरी सुरभा परब यांची म्हैस नदीपात्रात पडून मृत्युमुखी पडली होती . त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट आले होते.

यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी सूरभा परब यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपतालुकाप्रमुख संदीप पांढरे,तळवडे गावचे शाखा प्रमुख अनिल जाधव,अर्बन बँक चेअरमन विलास परब, तळवडे विकास सेवा सोसायटी अध्यक्ष आपा परब, उपविभाग प्रमुख प्रशांत बुगडे ,रविंद्र सावंत, माजगाव विभाग प्रमुख सुनिल राऊळ, पत्रकार जय भोसले यावेळी उपस्थित होते.