गणेश उत्सव जवळ आल्याने गणेश चित्र शाळा गजबजल्या

गणेशोत्‍सव जवळ आला असून आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार

गोवा सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने पण गणेशमूर्तीकरांना आर्थिक अनुदान द्यावे -सिंधुदुर्ग जिल्हा गणेश मूर्तिकार संघ जिल्हा खजिनदार दीपक जोशी

सावंतवाडी

गणेशोत्‍सव जवळ आला असून आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश शाळा सध्या गजबजू लागले आहेत गणेश उत्सव दोन दिवसांवर येऊन टेपला आहे. आज कोकणांत गणेशभक्‍त गणेश उत्सव सण उत्‍साहात साजरा करतात.

बाप्पाचा आगमनाचा उत्साह

आज कोकणात गणेश उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो गणेश चित्र शाळा सध्या रात्र दिवस लागले आहेत आज कोकणामध्ये मोठ्या थाटात गणेश उत्सव साजरा केला जातो.

गोवा सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने पण गणेशमूर्तीकरांना आर्थिक अनुदान द्यावे -सिंधुदुर्ग जिल्हा गणेश मूर्तिकार संघ जिल्हा खजिनदार दीपक जोशी

कोकणात जास्त करून शाडू मातीच्या व खाण मातीपासून गणेश मूर्ती बनवल्या जातात. कोकणातील गणेश भक्त यांनी शाडू माती व खाण माती पासून गणेशमूर्ती बनविल्या जातात.शाडू माती किंवा खाण माती पासून बनवलेल्या गणेश मूर्तीचे पुजन कराव्या जेणेकरून पर्यावरणाला त्याचा त्रास होणार नाही ,याची दक्षता गणेश भक्तगण यांनी घ्यावी असे मत सिंधुदुर्ग जिल्हा गणेश मूर्ती संघाचे जिल्हा खजिनदार दीपक जोशी यांनी मत व्यक्त केले ,

गोवा राज्यात ज्याप्रमाणे तेथील शाडू माती व खाण माती पासून बनवलेल्या मूर्तिकारांना शासन अनुदान देते त्याप्रमाणे आपल्या राज्य शासनाने पण शाडू माती व खाण माती पासून बनवलेल्या गणेश मूर्तीकरांना अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली. सिंधुदूर्ग जिल्हा गणेश मूर्ती कार संघातर्फे पालकमंत्री रविंद्र चव्हाण व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना याबाबत लवकर निवेदन देण्यात येणार आहे असे यावेळी त्यांनी मत व्यक्त केले. हया सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1000 च्या वर गणेश मूर्तिकार गणेश मूर्ती बनवतात त्यांना राज्य शासनाने आर्थिक प्रोत्साहन पर अनुदान दिल्यास शाडू माती व खाण मातीच्या मूर्ती बनवण्याचे प्रमाण वाढणार आहे .