सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळवडे येथे उत्साह संपन्न

65 च्या वर तालुक्यातील संघ झाले होते सहभागी

सावंतवाडी

सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा तळवडे येथील श्री जनता विद्यालय मध्ये संपन्न झाल्या . क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि तालुका समन्वय समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा तळवडे येथील श्री जनता विद्यालयाच्या मैदानात नुकत्याच संपन्न झाले. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांचे हस्ते श्रीफळ वाढवून व क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आले .यावेळी खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांद्याचे मुख्याध्यापक तथा सावंतवाडी तालुक्याचे समन्वयक नंदकिशोर नाईक यांनी विद्यार्थी खेळाडूंना स्पर्धेच्या सूचना व शुभेच्छा दिल्या.
निवृत्त क्रीडाशिक्षक आनंद सावंत तसेच सहभागी संघाचे क्रीडा शिक्षक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी या तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेत साधारणता 65 च्या वर संघ सहभागी झाले होते.14 वर्षे मुलगे विजेत्या सघ मध्ये कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी तर उपविजेता मुलगे संघ मी मिलाग्रीज हायस्कूल सावंतवाडी तर 14 वर्षे मुली विजेत्या संघात श्री जनता विद्यालय तळवडे व उपयोजिता संघात माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज सांगली हे संघ विजेते ठरले.

तसेच 17 वर्ष मुलगे संघामध्ये विजेता -राणी पार्वती देवी हायस्कूल व जुनिअर कॉलेज सावंतवाडी तर उपवेजेता संघ श्री जनता विद्यालय तळवडे तसेच 17 वर्षे मुली संघ विजेता संघात माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज सांगेली उपविजेता संघ राणी पार्वती देवी हायस्कूल कॉलेज सावंतवाडी तर 19 वर्ष मुलगे संघात विजेता माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सांगेली व उपविजेता मुलगे संघात राणी पार्वती देवी हायस्कूल व जूनियर कॉलेज सावंतवाडी 19 वर्षे मुली विजेत्या संघात राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी व उपविजेता मुली संघात माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज सागेली. यावेळी विजेत्या संघाची निवड सिधूनगरी येथे होणाऱ्या जिल्ह्यास्थरीय स्पर्धेसाठी झाली आहे .
यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जनता विद्यालयाचे पर्यवेक्षक तथा ज्येष्ठ क्रीडा शिक्षक दयानंद बांगर यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय सोनवणे यांनी केले