तळवडे पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त ४ ते ९ ॲाक्टोबर पर्यत विविध धार्मिक कार्यक्रम


सावंतवाडी
तळवडे येथील श्री देवी पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त ४ ते ९ ॲाक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शुक्रवार ४ रोजी सायंकाळी ७ ते १० भजने,रात्री १० ते १२ पर्यंत फुगडी व दांडियाचा कार्यक्रम शनिवार ५ रोजी स्वरसंध्या भावगीत भक्तीगीतांचा बहरदार कार्यक्रम,व फुगडी दांडिया, रविवार ६ रोजी रात्री ८ वाजता डबलबारी भजनाचा सामना श्री वडचीदेवी भजन मंडळ,देवगड ( बुवा – संदिप लोके ) पखवाज योगेश सामंत, तबला संदेश सुतार विरुद्ध श्री लिंगेश्वर भजन मंडळ,घोडगे भरणी ( बुवा – विनोद चव्हाण ) पखवाज महेश परब,तबला तुषार लोट यांना साथ करणार आहेत.सोमवार ७ रोजी रात्री ८ वाजता ( देवेंद्र नाईक प्रस्तुत ) चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ,चेंदवण यांचा ट्रिकसीन नाटक ‘ क्षेत्रपाल श्री देव वेतोबा ‘ मंगळवार ८ रोजी रात्री ८ वाजता ( लोकराजा श्री सुधीर कलिंगण प्रस्तुत ) कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ,नेरुर यांचा ‘ ट्रिकसीन नाटक व्यंकटेश पद्यावती ‘ बुधवार ९ रोजी रात्री ८ वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ,वेंगुर्ला यांचा ‘ भैरीभवानी ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन राजाराम गावडे यांनी केले.