शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मी सच्चाकार्यकर्ता आहे.!विधानसभा निवडणूक मी“धनुष्यबाण” चिन्हावरच लढणार! मंत्री दीपककेसरकर

सावंतवाडी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मी सच्चा
कार्यकर्ता आहे. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक मी
“धनुष्यबाण” चिन्हावरच लढणार, असे सांगून मंत्री दीपक
केसरकर यांनी भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या उलटसुटल
चर्चेला आज पुर्णविराम दिला. दरम्यान शिक्षणमंत्री म्हणून मी
राज्यात चमकदार कामगिरी केली आहे. मतदार संघात सुध्दा
मी कोट्यावधीचा निधी आणला. मंत्री म्हणून काम करीत
असताना कोणाच्या जमिनी खरेदी केल्या नाहीत. कोणाला
त्रास दिला नाही.त्यामुळे येणाऱ्या काळात येथील जनता
माझ्या पाठिशी ठामपणे उभी राहणार आहे, असे ते म्हणाले.
श्री. केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार
परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्यात मला विधानस’भा निवडणुकीत प्रचारासाठी
निमंत्रण आहे. पण माझ्या मतदारसंघात शिवसेना भाजप
महायुतीने माझ्या प्रचाराची धुरा सांभाळली तर मला राज्यात
प्रचाराला जायला सोपं जाईल असे शालेय शिक्षण व मराठी
भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी म्हटले आहे.

ज्या झाडाला फळे आहेत. त्याच झाडावर
दगड मारले जातात.माझे सर्व राजकीय पक्षांच्या सदस्यांनी
चांगले संबंध आहेत. मी जनकल्याणासाठी झटत आहे.
त्यामुळे टिका करणाऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांना
न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.

, गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन
वाटप प्रश्न जो वाद होता तो मिटला आहे. गेळे आंतरराष्ट्रीय
पातळीवरील पर्यटन स्थळ बनवायचे आहे.सरपंच सागर ढोकरे
व संदीप गावडे यांची आणि माझी चर्चा झाली आहे.