भाजप माजी जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश! तेली यांनी हाती घेतली ‘मशाल’




मुंबई
माजी आमदारतथा भाजप माजी जिल्हा अध्यक्ष यांनी आज ठाकरे सेनेत प्रवेश केला. राजन तेली हे आमचेच होते आणि आहेत, त्यांच्याप्रमाणे इतर दिशाभूल झालेले कार्यकर्ते देखील शिवसेनेत परत येतील, असा विश्वास ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला आहे. माजी आमदार राजन तेली यांनी काल भाजपला सोडचिठ्ठी देत आज मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यामुळें भाजपला सावंतवाडी मतदार संघात हा महायुतीला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार राजन तेली हे कायम शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात विकास करत नाहीत अशी टिका करत आहेत.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही असे त्यांचे मत आहे. त्यामूळे शालेय शिक्षण मंत्री केसरकर याच्यासमोर पणं हे निवडणूक काळात मोठ आवाहन आहे असे मानव लागेल ,त्यामुळे तेली यांचा प्रवेश हा भाजपला मोठा धक्का मानावा लागेल. भाजप पक्ष वाढविण्यासाठी त्यांचे मोलचे योगदान होत.