गोवा बनावटीच्या चोरट्या दारूच्या वाहतुकीवर बांदा पोलीसाची कारवाई 1 कोटी 6 लाख 40 हजार रूपयेच्या मुद्देमाल घेतला ताब्यात तर दोघा संशयीतावर कारवाई


सावंतवाडी
विधानसभा निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर इन्सुली चेकनाक्यावर वहानानची कसुन तपासणी सुरू असताना बांदा पोलीसाना गोव्याहुन मोठ्याप्रमाणात गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची वहातूक होणार असल्याची पक्की खबर मीळाली होती. एम. एच. 10 बि. आर. 3900 हा आठ चाकि ट्रक आला असता ट्रकची झडती घेतल्यावर ट्रकमध्ये मोठ्याप्रमाणात गोवा बनावटीची वेगवेगळ्या प्रकारची चोरटी दारू सापडून आली.या चोरट्या दारूच्या वहातूकिवर कारवाई करून 67 लाख 20 हजार रूपयाचे मद्य , 20 लाख रूपये किमंतीचा ट्रक मीळुन 1 कोटी 6 लाख 40 हजार रूपयाच्या मुद्देमालासह शिवाजी महादेव शिगांडे,53 विद्याधर बापू एतवडे 40 दोघे रहाणार बेडग. ता.मिरज.जि.सांगली या संशयीतावर कारवाई करून ताब्यात घेतले.सदरची कारवाई काॅस्टेबल राजेंद्र कापसे व सहकार्याने केली.अधीक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.झाजूर्णे करत आहेत.