अर्चना घारे-परब हया बंडखोरीच्या तयारीत? उदया आपली भूमिका मांडणार???उद्या २५ रोजी कार्यकर्त्याचा मेळावा,


सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माजी आमदार राजन तेली यांचे नाव जाहीर करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादीच्या माध्यमातून विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या अर्चना घारे- परब यानी नाराजी व्यक्त केली असून त्या बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. सावंतवाडी मतदारसंघात असलेला जनतेशी असलेला दांडगा जनसंपर्क लक्षात घेता त्यांना उमेदवारी मिळायला हवी होती.
गेली अनेक वर्षे ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मध्ये कार्यरत आहेत. त्याच्या रूपाने स्वच्छ ,प्रतीभा संपन्न नविन चेहरा आमदार म्हणून सावंतवाडी मतदार संघाला मिळणार आहे असे सर्वसामान्य जनतेतून व कार्यकर्ते याच्याकडून मागणी होत आहे. महाविकास आघाडीच्या या रणधुमाळीत त्यांना दुर ठेवण्यात आल्याने सावंतवाडी मतदार संघातील कार्यकर्ते नाराज झाले असून. त्यांनी अर्चना घारे यांना बंडखोरी करण्याचा आग्रह धरला असल्याने उद्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून अर्चना घारे-परब आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
