शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी केले स्वामीं समर्थ याच्या पादुकांचे पूजन!




सावंतवाडी
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका आज सावंतवाडी शहरात आल्या असता यावेळी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी श्री स्वामी समर्थ याच्या पादुकांचे आपल्या निवासस्थानी पुजन केलें.
यावेळी मंत्री दिपक केसरकर यांनी स्वामींच्या पादुकांचे पूजन सपत्नीक केले. यावेळी निवडणूकीत घवघवीत यश मिळावे, असे साकडे देखील घालण्यात आले. यावेळी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर, तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.


