मंत्री दीपक केसरकर यांची सावंतवाडी शहरात प्रचारार्थ काढली रॅली !



सावंतवाडी: शालेय शिक्षण मंत्री व महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. येऊन येऊन येणार कोण दीपक भाईंशिवाय आहे कोण? अशा घोषणा देत श्री. केसरकर यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी मतदारांना केले.
या प्रचार रॅलीस उमेदवार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक संजु परब, तालुकाप्रमुख नारायण राणे, महायुतीचे पदाधिकारी,महिला, युवा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावंतवाडी, वेंगुर्ला येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

