राज्यात महायुतीचीच सत्ता येईल !मंत्री दीपक केसरकर ! कोकणात तिन्ही उमेदवार महायुतीचेच निवडून येतील

जिल्ह्यातील आणि मतदार संघातील जनतेसाठी आरोग्य, रोजगार, पर्यटन तसेच शाश्वत विकासासाठी यापुढे लक्ष देणार

सावंतवाडी : 

राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येईल असा ठाम विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी झूम मीटिंग द्वारे घेतलेल्या पत्रकार परिषद वेळी मत व्यक्त केले. आपण यापुढे आता आरोग्य शिक्षण व रोजगाराकडे महत्त्वाचा लक्ष देणार आहे.आता आपण कोकणच्या विकासासाठी लक्ष देणार असे यावेळी त्यांनी मत व्यक्त केल.आपला विजय हा निश्चित आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व भाजप शिवसेना व सहकारी मित्र पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची मेहनत यामुळें आपला विजय होणारं आहे. उद्या सर्वत्र विधानसभेचे निकाल लागणार आहेत. यात सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातून माझा विजय नक्की असून याचे सर्व श्रेय आमच्या महायुतीच्या तमाम शिलेदारांना जाते. यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच माझ्यासाठी रात्रंदिवस सटणारे महेश सारंग, संजू परब आणि सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यांतील तमाम महायुतीचे पदाधिकारी तसेच माझ्या कार्यालयातील संपूर्ण स्टाफ यांनी रात्रंदिवस माझ्यासाठी मेहनत घेतली. त्या सर्वांचेच मी ऋण व्यक्त करतो. उद्या नक्की मला विजय मिळेल आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल, असा आशावाद शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. दृश्य प्रणालीद्वारे आयोजित पत्रकर परिषदेत मंत्री केसरकर बोलत होते.

यावेळी दीपक केसरकर पुढे म्हणाले की, मला सिंधुदुर्गच्या जनतेचे खूप प्रेम मिळाले आहे. या प्रेमाच्या आधारावर आणि देवाच्या आशीर्वादामुळेउद्या मी नक्कीच विजयी चौकार मारणार आहे. मात्र या माझ्या विजयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे सर्व शिलेदार, तमाम सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सामान्य जनता या सर्वांचेच योगदान राहिले आहे. मला यापुढे माझ्या जिल्ह्यातील आणि मतदार संघातील जनतेसाठी आरोग्य, रोजगार, पर्यटन तसेच शाश्वत विकासासाठी लागणाऱ्या विविध बाबींसाठी काम करायचे आहे. त्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही मंत्री केसरकर यांनी नमूद केले.

दरम्यान, रोजगारासाठी जर्मनी येथे पहिली बॅच रवाना झाली असल्यामुळे आगामी काळात किमान एक लाख तरुण जर्मनीत नोकरीसाठी कसे जातील?, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही केसरकर यांनी यावेळी सांगितले.