राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठें मताधिक्य मिळाल्याबद्दल या महाविजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेत केलें अभिनंदन

सावंतवाडी :

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठें मताधिक्य मिळाले. विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. या महाविजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेत अभिनंदन केले. राज्यातील नव्या ट्रीपल इंजीन सरकारसाठी त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. यावेळी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलें.